Marathi Ukhane Navari & Navara -


नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Ukhane शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन  Marathi Ukhane Navari & Navara चे अपडेट्स मिळतील.


नवीन मराठी उखाणे 


Marathi Ukhane | चावट मराठी उखाणे । नवरीसाठी  मराठी उखाणे ।
Marathi Ukhane | Marathi Ukhane Navari & Navara |1) मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.2) छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.3) गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,
.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.4) माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.5) कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.
6) रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.7) खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.8) पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.9) मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.10) सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,

… रावांचे नांव घेते, …च्या घरात.
नवरी साठी  लय भारी मराठी उखाणे Marathi Ukhane | चावट मराठी उखाणे । नवरीसाठी  मराठी उखाणे ।
Marathi Ukhane | Marathi Ukhane Navari & Navara |


१) सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,.......... रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.


२) नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, .......रावांना शेवटी अहोच म्हणायचे.


३) कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट.... नाव घेते बांधते......... च्या लग्नाची गाठ.


४) वाट जीवनाची झाली सुखद आनंदी .... च्या सवे चालते मी सप्तपदी... !!


५) चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची, ----- रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
६) लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, ..........चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.


७) सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!


८) हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा, …. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!


९) शेल्या शेल्याची बांधली गाठ, .......नाव मला तोंडपाठ.


१०) नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते..... च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
भन्नाट मराठी उखाणे फक्त तुमच्यासाठी 
1) यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… . . . . . . .  रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,2) अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… . . . . . . . रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,


3) लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… . . . . . . . रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.


4) पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… . . . . . . . रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.


5) आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… . . . . . . . राव हेच माझे अलंकार खरे.
6) पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
… . . . . . . . रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

7) सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… . . . . . . . रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

8) राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… . . . . . . . रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,

9) श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… . . . . . . . रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.

१0) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… . . . . . . . रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.


मनाला भिडणारे मराठी उखाणे १) कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.


२) यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब ----- चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.


३) गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ........ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.


४) वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ..... चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.


५) बारीक मणी घरभर पसरले, …… साठी माहेर विसरले.६) पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, ….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.


७) लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.


८) चंदनी पानात मुग्ध कळी हसली, …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.


९) रुपेरी सागरावर चंदेरी लाट, …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.


१०) परसात अंगण, अंगणात तुळस, …. नाव घ्यायचा मला नाही आळस.
चावट मराठी उखाणे 
Marathi Ukhane | चावट मराठी उखाणे । नवरीसाठी  मराठी उखाणे ।
Marathi Ukhane | Marathi Ukhane Navari & Navara |

१) लग्नाचा वाढदिवस करू साजरा, …. तुला आणला मोगऱ्याचा गजरा.


२) प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, …. सारखा हिरा.


३) काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, …. च्या साह्याने सुखी झाले जीवन.


४) यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, …. सोबत सुखी आहे सासरी.


५) फुलासंगे मातीस सुवास लागे, …. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.


६) दही,साखर, तूप, ….. राव मला आवडतात खूप.


७) मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.


८) शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, …. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.


९) धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले …. राव अशीच असते प्रीती.


१०) एका वर्षात असतात महिने बारा, …. च्या नावात समावलाय आनंद सारा.आम्ही लग्नाळू बेस्ट उखाणे 31) वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.


2) घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.


3) जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,
घडविले देवानी… रावांना जीव लावून,


4) धरला यांनी हात, वाटली मला भिती,
हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.


5) नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
…रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन,


6) हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.


7) नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,


8) राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,


9) पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,
… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,


१0) चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. रावांचे नांव घेते,… ची सुन.नवऱ्यासाठी मस्त , रोमँटिक  उखाणे 


Marathi Ukhane | चावट मराठी उखाणे । नवरीसाठी  मराठी उखाणे ।
Marathi Ukhane | Marathi Ukhane Navari & Navara |


१) फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, …. च्या नादाने झालो मी बेभान.


२) कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ...... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.


३) परातीत परात चांदीची परात, …. लेक आणली मी …. च्या घरात.


४) …. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 


५) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, …. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 


६) संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी …. म्हणते मधुर गाणी. 


७) श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा. 


८) पाच बोटातून होते कलेची निर्मिती, …. वर जडली माझी प्रीती. 


९) खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन. 


१०) ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.


उतावळा नवरा मस्त उखाणे मराठी १) वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर… हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर. 


२) केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ, हिचं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ. 


३) तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.


४) चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली. 


५) अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम. 


६) काट्यात काटा गुलाबाचा काटा, हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता. 


७) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, .... ला घास भरवतो वरणभात तूपाचा. 


८) आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, .....चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड. 


९) काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, .....चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. 


१०) हा दिवस आहे आमच्याकरिता खास, .... ला देतो गुलाबजामचा घास
सणासाठी  वापरले  जाणारे उखाणे १) ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ….. चे नाव घेते …. च्या दिवशी. 


२) दत्तदिगंबराला औदुंबराची सावली, पूजेच्या दिवशी नाव घेते,  ....... रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.


३) आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी, …. चं नाव घेते बारशाच्या दिवशी. 


४) जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण ----नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण. 


५) ..... सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.  .....माझा हीरो मी त्याची हिरॉईन


६) नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि …. नाव घेऊन  लक्ष्मीपूजन करते!


७) मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी, .......नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
हळदीकुंकवासाठी खास उखाणे 


१)  सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.


२) जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ....च्या नावाला.


३) लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,........... च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.


४) नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी.....च्या जीवनात....ही गृहिणी.


५) अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो .....नी माझी जोडी.
मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे 


१) बरेचदा लग्नानंतर येणार पहिला सण असतो मकरसंक्रांत. लग्नाच्या पहिल्या वर्षी हा सण नववधूला खास हलव्याचे दागिने घालून हळदीकूंकू ठेवून साजरा केला जातो. या दिवशी घेण्यासाठी काही खास उखाणे.  


२)  तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा, …. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा. 


३) सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, …. नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.


४) गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, …. चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.


५) तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, …. चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.


६) पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया, ....रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!


Marathi Ukhane | चावट मराठी उखाणे । नवरीसाठी  मराठी उखाणे ।
Marathi Ukhane | Marathi Ukhane Navari & Navara |


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Marathi Ukhane असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please : आम्हाला आशा आहे की हे  Marathi Ukhane | Marathi Ukhane Navari & Navara | तुम्हाला आवडले असतीलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… 

नोट : या लेखात दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Post a Comment

Previous Post Next Post